(एक जिल्हा शासकीय रुग्णालय/महापालिका रुग्णालये चार)
किती रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे?
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट गेल्या वर्षाच्या अखेरीस झाले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाने गेल्या वर्षी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही फायर ऑडिट झालेले नाही.
किती रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट झाले आहे?
महापालिकेच्या रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. मात्र, सर्व रुग्णालयात विद्युत विभागाचा कर्मचारी (विजेरी) नियुक्त आहे. ते नियमितपणे विजेची उपकरणे तपासतात. जिल्हा शासकीय रुग्णालयाने गेल्या वर्षी फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे, परंतु अद्याप इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही.
सुरक्षा व्यवस्थेची काय स्थिती आहे?
सुरक्षा व्यवस्था म्हणून सुरक्षा कर्मचारी, तसेच सीसीटीव्ही आहे.
रुग्णांमागे डॉक्टर, परिचारिकांची संख्या- नाशिक महापालिका एकूण ४७ कायम तर ८६ हंगामी डॉक्टर्स, ४१६ स्टाफ नर्स, २२८ परिचारिका जिल्हा रुग्णालयात एकूण ६५ डॉक्टर्स, १५० नर्स, ७५ परिचारिका.
आपत्कालीन व्यवस्था आहे का?
रुग्णालयासाठी असलेल्या शासकीय निकषाप्रमाणे आपत्कालीन व्यवस्था दोन अवागमन मार्ग आहेत.