नाशिक : सध्याच्या पावसाळी दिवसांमध्ये ग्रामीण व आदिवासी जनतेला आरोग्य सुविधांची अत्यंत निकड असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास हजर राहून उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवावी, तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासह आरोग्य केंद्रावरील निवासी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि.७) आरोग्य विभागामार्फत जिल्ह्णातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. विजय डेकाटे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतानाच ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती व सेवा यांसह पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी याविषयी माहिती घेतली. ग्रामीण भागात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, यासाठी आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:21 AM
नाशिक : सध्याच्या पावसाळी दिवसांमध्ये ग्रामीण व आदिवासी जनतेला आरोग्य सुविधांची अत्यंत निकड असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास हजर राहून उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवावी, तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासह आरोग्य केंद्रावरील निवासी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत.
ठळक मुद्देआढावा बैठक : आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांनी मुख्यालयात हजर राहावे