चांदवड : चांदवड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेल्या कांद्याच्या पोळमधून चोरट्यांनी कांदा चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीमुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.चांदवड व येवल्यासह परिसरात कांदा नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सध्या कांद्याचे दर वाढल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. कांद्याचे दर तेजीत असताना कांदा चोर सक्रिय झाले असून, चांदवड तालुक्यातील कातरवाडी, वडगाव पंगू व येवला तालुक्यातील कातरणी शिवारात वनविभागाचे क्षेत्र असल्याने कांदे मध्यरात्रीच्या सुमाराला चोरून नेल्याच्या घटना घडत आहे, तर चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू शिवारात कातरवाडी येथील पांडुरंग मुरलीधर झाल्टे यांची शेतजमीन त्यांची वारसदार मुलगी ठकूबाई कौतिक कदम या करीत असून यांच्या शेतातून तीन क्विंटल कांदा शेतातून चोरी गेल्याचे लक्षात आले तर चांदवड येवला शिवारात असलेल्या खंडू निवृत्ती रसाळ (रसाळ वस्ती) कुंभारखेड (सीमेंट) रस्ता हे घरापासून पन्नास ते साठ फुटावरच झोपलेले असताना तीन ते चार क्विंटल कांदे चोरीस गेले.सकाळी उठल्यावर ढगाळ वातावरणामुळे कांदा सारवासारव करण्याकरिता गेले असता भामट्यांनी कांदे लंपास केल्याचे आढळून आल्याचे निदर्शनास आले. तसेच चंद्रकात अशोक गांगुर्डे (गांगुर्डे वस्ती) कुंभारखेड रस्त्यालगत डोंगर पायथ्याशी असून, रात्रीच्या सुमारास अडीच क्विंटल कांदे लंपास झाल्याची घटना घडली आहे. सध्या कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याला सोन्याचा दर आल्याने ग्रामीण भागात शेतातील उभे कांदे उपटून नेणारी तर कांद्याची पोळ असलेल्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे.
पोळमधून कांद्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:02 AM
चांदवड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेल्या कांद्याच्या पोळमधून चोरट्यांनी कांदा चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीमुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
ठळक मुद्देचांदवड व येवला तालुका : शेतकरी भयभीत; हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान