लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुक्यातील देवळे येथे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मंगळवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास अडीच लाख रूपये किमतीचे इलेक्ट्रिक साहीत्य चोरीला गेल्याची फिर्याद समृद्धी महामार्गाचे अभियंता किरणकुमार चप्पीयाला यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, १ वर्षापासुन समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. जी. व्ही. पी. आर कंपनीचे इगतपुरी तालुक्यातील देवळे शिवारात खडी क्रेशरसाठी इलेक्ट्रीक सबस्टेशन बनविण्याचे काम चालु आहे. त्यासाठी कंपनीने भरपुर साहीत्य खरेदी केलेले असुन कंपनी कॅम्पमध्ये सब स्टेशनला पाणी मारण्यासाठी पाण्याच्या मोटार बसविण्यात आलेल्या आहेत.इलेक्तिट्रक सप्लायसाठी कॉपरची आर्थिंग वायर पसरवलेली असुन जनरेटरसाठी बॅटरी व इतर लोखंडी व इलेक्ट्रीक वस्तु ठेवलेल्या आहेत. मात्र ३१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८ च्या सुमारास यातील काही वस्तु चोरीला गेल्याचे लक्षात आले.यात १ लाख ५९ हजार ५०० रु पये किमतीची कॉपरचे रॉड व जुने वापरते इलेक्ट्रिक अर्थिंगसाठी लावलेले कॉपर, ४० हजार रु पये किमतीच्या कॉपरच्या पट्या, २३ हजार ५०० रूपये किमतीची पाच एचपीची वापरती पाण्याची मोटार, ४५०० रु पये किमतीची एक एचपीची वापरती मोटार, २४ हजार रु पये किमतीच्या दोन वापरत्या बॅटरी असे एकुण २ लाख ५१ हजार ५०० रूपये किमतीचे इलेक्ट्रिक सामान चोरीला गेले आहे.या बाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
समृद्धी महामार्ग कामातील अडीच लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 4:52 PM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील देवळे येथे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मंगळवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास अडीच लाख रूपये किमतीचे इलेक्ट्रिक साहीत्य चोरीला गेल्याची फिर्याद समृद्धी महामार्गाचे अभियंता किरणकुमार चप्पीयाला यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे.
ठळक मुद्दे३१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी वस्तु चोरीला गेल्याचे लक्षात आले.