शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

चेंबरमधून चोरून शेतीसाठी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:59 AM

नाशिक : महापालिकेने शहरात राबविलेल्या भुयारी गटार योजनेचे चेंबरमधील मलजल अडवून त्याचा शेतीसाठी पाणी वापरण्याचा प्रकार वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उघड झाला आहे. अशाप्रकारे आढळलेला हा तिसरा प्रकार असून, चेंबरमध्ये अडथळे आणल्याने गटारी तुंबण्याचे प्रकार या चोऱ्यांमुळे उघड होत आहे.

ठळक मुद्देवाघ कॉलेजजवळील प्रकार : लोखंडी प्लेटसह पाइप जप्त

 

नाशिक : महापालिकेने शहरात राबविलेल्या भुयारी गटार योजनेचे चेंबरमधील मलजल अडवून त्याचा शेतीसाठी पाणी वापरण्याचा प्रकार वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उघड झाला आहे. अशाप्रकारे आढळलेला हा तिसरा प्रकार असून, चेंबरमध्ये अडथळे आणल्याने गटारी तुंबण्याचे प्रकार या चोऱ्यांमुळे उघड होत आहे.महापालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजना १९९७ नंतर राबविण्यात आली. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मलवाहिकांचे जाळे विस्तारण्यात येते. नेहरू नागरी अभियानांतर्गतही महापालिकेने भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक एक व दोन तयार करून त्यादेखील पूर्ण केल्या होत्या. आणखी अमृत योजनेअंतर्गतही मलवाहिका टाकण्याचा प्रस्ताव आहे. मलवाहिकांच्या माध्यमातून महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात पाणी जाते आणि तेथे प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडले जाते. परंतु या पाण्यावर डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहेत.मनपाने सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले आणि चेंबरची सफाई सुरू केली आहे. पंचवटी परिसरात महापालिकेने ही मोहीम राबवित असताना के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस मलवाहिकेत आणि चेंबरमध्ये पाणी येत नसल्याचे आढळल्यानंतर त्याचा शोध घेत घेत पालिकेच्या कर्मचाºयांनी सर्व चेंबर स्वच्छ केले. यावेळी वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस एका चेंबरमध्ये मोठी लोखंडी प्लेट आढळली. अशाप्रकारची प्लेट टाकल्याने पाणी अडते आणि मग ते पंपाने शेतीसाठी वापरले जाते. महापालिकेच्या कर्मचाºयांनी ही प्लेट जप्त केली आहे.यापूर्वी म्हसरूळ आणि अंबड या दोन ठिकाणी असाच प्रकार आढळला होता. या दोन्ही प्रकरणात महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पंचवटीतील प्लेटबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल नसली तरी प्लेटमधून पाणी कोण अडवत होते, याचा शोध पालिका घेत आहेत.