शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

पुराव्यासोबतच चढणार भाजपा कार्यालयाची पायरी

By admin | Published: February 13, 2017 12:42 AM

तिकीटविक्री प्रकरण : आयोगाकडून घेणार मार्गदर्शन

 नाशिक : भाजपाच्या उमेदवारांकडून दोन लाख रुपये घेण्याचा आणि उमेदवारीसंदर्भात दहा लाख रुपयांच्या मागणीसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वसंत स्मृती येथे आचारसंहिता पथकाने धडक दिली, परंतु भाजपा नेत्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे हे पथक नमले. आता मात्र, व्हिडीओ आणि वृत्तपत्रातील या पक्षाच्या नाराजांचे देवाण-घेवाणीचे आरोप यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊन हे पथक पुढील आठवड्यात पुन्हा पक्ष कार्यालयावर धडकणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीचे वाद प्रचंड गाजले. ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देताना मोठे आर्थिक व्यवहार झाले असे आरोप अनेक डावललेल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यातच भाजपाच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात उमेदवारांकडून दोन दोन लाख रुपये घेण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पाठोपाठ दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप करणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत गेल्याच आठवड्यात आचारसंहिता कक्षाच्या पथकाने वसंत स्मृती या भाजपा कार्यालयावर धडक दिली होती. परंतु पक्षाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात तपासणीसंदर्भात काही लेखी आदेश असतील तर दाखवा, अशी भूमिका घेतल्याने पथकाला माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर लेखीपत्र घेऊन येतो असे सांगणारे पथकाचे अधिकारी अद्याप भाजपा कार्यालयाच्या वाटेला गेले नाही. तथापि, आता लवकरच भक्कम खात्री आणि पुरावे घेऊन वसंत स्मृतीचे दरवाजे ठोठावणार आहे.यासंदर्भात आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख असलेल्या उपजिल्हाधिकारी सरिता नरके यांनी सांगितले की, भाजपासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पथकाने तपासणी सुरू केली आहे. संबंधित व्हिडीओ प्रकरणाची वैधता तपासण्यात येणार असून त्यानंतर वृत्तपत्रात उमेदवारांनी केलेले आरोप आणि अन्य बाबींची खात्री पटविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेण्यात येणार असून, त्यानंतरच पथक भाजप कार्यालयात जाणार आहे.