शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पाऊले चालती निवृत्तीनाथांची वाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 2:41 PM

त्र्यंबकेश्वर : धन्य धन्य निवृत्ती देवा                   काय महिमा वर्णावा... असे ...

त्र्यंबकेश्वर : धन्य धन्य निवृत्ती देवा                  काय महिमा वर्णावा...असे एक ना अनेक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांवर केलेले संत तुकाराम, संत नामदेव महाराज आदी संतांचे अभंग गात नाशिक जिल्ह्यातुनच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातुन अनेक पायी दिंड्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे झेपावत आहेत. एकुणच त्र्यंबकेश्वरकरांना आता निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे वेध लागले आहेत तर वारकरी भाविक यांना निवृत्ती रायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. परवापासुन लहान दिंड्या येण्यास सुरु वात होईल तर दशमीला सायंकाळ पर्यंत सर्व मोठ्या दिंड्या त्र्यंबक मध्ये दाखल होतील. सुमारे ६०० ते ६५० दिंड्या येण्याची शक्यता आहे.येत्या पौष वद्य एकादशी (दि.२०) सोमवार या दिवशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा भरणार आहे. या निमित्ताने नवमी दशमी एकादशी व द्वादशीअशी चार ते पाच दिवस ही यात्रा भरत असते. वास्तविक खरी यात्रा दशमी एकादशी व द्वादशी पर्यंत अशी तीनच दिवसापर्यंत चालते. या पाशर््वभूमीवर नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत दोन प्रशासकीय बैठका खास यात्रा नियोजन व निर्मल वारी संदर्भात झाल्या त्यानंतर त्र्यंबक नगरपरिषदेची बैठक झाली. तर परवा प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, पोलीस पोलीस उपविभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले, रामचंद्र कर्पे, शहर अभियंता अभिजित इनामदार आदी मान्यवर बैठकीच्या अगोदर यात्रा पटांगण, गावातील यात्रा भरते ती नियोजित गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी पदयात्रेने पाहणी केली. त्यानंतर यात्रेत सहभागी होणा-या यंत्रणांची व पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली.निवृत्तीनाथ यात्रा अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे.महाराष्ट्रातुन विविध गावातील तसेच प्रमुख संताच्या पायी दिंड्या निवृत्तीरायाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरची वाट झपाट्याने तुडवित आहेत. कधी जीवघेण्या थंडीत तर कधी कधी दिवसा तिव्र उन्हाची पर्वा न करता वारकरी भाविक केवळ निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी चालत राहतात.

टॅग्स :Nashikनाशिक