लासलगाव : निफाड विधानसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनकर यांचा ३९२१ मतांनी पराभव केला.दिलीप बनकर (७४,२६५ मते), अनिल कदम (७८,१८६), काँग्रेसचे राजेंद्र मोगल (५८७१), भाजपाचे वैकुंठ पाटील (१८०३१), मनसेचे सुभाष होळकर (१३६९), बसपाचे धर्मेंद्र जाधव (३२०९) व अपक्ष नईम शेख यांना ११७७ मते मिळाली. १८२,४७६ मते वैध, तर दहा मते अवैध ठरली. नकारात्मक मत (नोटा) ११७७ होती.सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली. चौदा टेबलवर प्रत्येकी चार कर्मचारी मतमोजणी करीत होते. एकोणावीस मतमोजणीच्या फेऱ्या झाल्यावर निकाल घोषित करण्यात आला.पहिल्या सात फेऱ्यांपर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेस उमेदवार बनकर आघाडीवर होते. त्यानंतर मात्र शिवसेनेचे अनिल कदम यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. निफाड व गंगाथडी भागातील मतांनी अनिल कदम यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. जिल्ह्यात सर्वाधिक ७४ टक्के मतदान निफाड मतदारसंघात झाले होते. निफाड मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा अधिक गटातटाचे व नात्या गोत्याचे राजकारण महत्त्वाचे ठरले आहे.नकारात्मक राजकीय भूमिका निफाड तालुका राजकारणाला वेगळ्या वाटेवर घेऊन गेल्या. मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनकर व शिवसेना उमेदवार अनिल कदम यांच्यात चुरशीची लढत झाली. (वार्ताहर)
कदमांचा सलग दुसऱ्यांदा विजय
By admin | Published: October 19, 2014 9:43 PM