शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘त्या’ सावत्र बापाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 1:03 AM

सदनिका स्वत:च्या नावावर करून देण्याच्या वादातून दोघा सावत्र मुलांवर सर्व्हीस पिस्तूलने गोळ्या झाडून आपल्या दोन्ही सावत्र मुलांना ठार मारणारा पोलीस कर्मचारी संशयित संजय भोये यास जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि.२८) सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पंचवटी : सदनिका स्वत:च्या नावावर करून देण्याच्या वादातून दोघा सावत्र मुलांवर सर्व्हीस पिस्तूलने गोळ्या झाडून आपल्या दोन्ही सावत्र मुलांना ठार मारणारा पोलीस कर्मचारी संशयित संजय भोये यास जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि.२८) सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात असलेल्या राजमंदिर सोसायटीत भोये याने दोघा सावत्र मुलांवर पिस्तूलमधून चार गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी (दि.२१) आली होती. या घटनेत अभिषेक ऊर्फ सोनू नंदकिशोर चिखलकर त्याचा भाऊ शुभम नंदकिशोर चिखलकर यांचा मृत्यू झाला होता. गोळ्या झाडल्यानंतर भोये स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यास शनिवारी (दि.२२) न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. भोये हा उपनगर पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून नोकरीला असताना भोये व त्याच्या पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मयत सोनू आणि शुभम यांच्यात काही दिवसांपासून आजोबांनी आईला घेऊन दिलेला फ्लॅट नावावर करून देण्यासाठी वाद सुरू होते. शुक्र वारी (२१) सकाळी याच कौटुंबिक कारणावरून पुन्हा वाद निर्माण झाले. त्यावेळी भोये कामानिमित्त न्यायालयात होते तेथून घरी परतले असता वाद सुरूच होता. त्यावेळी दोघे मुले व भोये यांच्या पुन्हा शाब्दिक चकमक झाली. त्यातून अजून वाद वाढला त्यावेळी घरात पत्नी, मुलगी व स्नुषा होती. भांडण झाल्याने मुलगी खाली निघून गेली त्यावेळी संतप्त झालेल्या भोये याने पिस्तूलमधून दोघा मुलांवर चार गोळ्या झाडल्या. सोनूच्या डोक्यात गोळी लागल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर शुभम हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी तत्काळ जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर भोये हा स्वत: पंचवटी पोलीस ठाण्यात हजर होऊन सावत्र मुलांवर गोळ्या झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी