नाशिक : महापालिका हद्दीत श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण करण्यात येते. त्यातून किती संख्या नियंत्रित झाले याबाबत नागरिकांचे दुमत असले तरी आत्तापर्यंत ६२ हजार श्वानांवर निर्र्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी तर १२ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, आता यापुढेदेखील हीच कृती करण्यासाठी तब्बल ७०० रुपये प्रतिश्वान या दराने काम देण्यात आले आहे.शहरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जातात. झुंडीने फिरणारे श्वान मुलांवर किंवा दुचाकीस्वारांवर हल्ला करतात. परंतु महापालिकेकडून मात्र त्यावर प्रभावी कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप केले जातात. महापालिकेला कायदेशीरदृष्ट्या भट्या श्वानांना मारता येणे शक्य नसल्याने संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण केले जाते, यासंदर्भात पशु वैद्यकीय विभागाकडून वेळोवेळी आकडेवारी जाहीर केली जात असली तरी एकंदरच त्याविषयी शंका व्यक्त केली जाते. संख्या नियंत्रित करण्यासाठी जर इतक्या वर्षांपासून प्रयत्न केले जात असतील तर मग अद्याप श्वानांची संख्या कमी होत नाही, असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.महापालिकेने श्वान निर्बीजीकरणासाठी नुकतेच एका संस्थेला काम दिले असून, एका श्वानाच्या निर्बीजीकरण आणि रेबीज लस देण्यासाठी ७०० रुपये असा दर मंजूर करण्यात आला आहे. यावेळी माहिती देताना आत्तापर्यंत ६२ हजार श्वानांवर निर्बीजीकरणाची प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गेल्यावर्षी १२ हजार श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याचा अर्थदर महिन्याला एक हजार श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.महापालिकेने नवीन ठेका दिला आणि आत्तापर्यंतचा अहवाल सादर केला तरी शहरात भटक्या श्वानांची संख्या मात्र कमी होत नसून त्यामुळे प्रशासनाच्या दाव्याविषयी संशय व्यक्त केला जात आहे.श्वानांची गणनाच नाही...महापालिकेने ६२ हजार श्वान निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला असला तरी मुळातच शहरात श्वानांची एकूण संख्या किती होती, याबाबतचा तपशीलच नाही. आधी शहरातील श्वानांची मोजणी करावी आणि मग शस्त्रक्रिया केली अशी परिपूर्ण कार्यवाही झाली असती तर एकूणच किती पैकी ६२ हजार श्वानांवर शस्त्रक्रिया झाली हे स्पष्ट झाले असते. यासंदर्भात महापालिकेने नेमलेल्या प्राणिमित्रांच्या समितीतदेखील चर्चा झाली होती.
शहरातील ६२ हजार श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:08 AM
महापालिका हद्दीत श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण करण्यात येते. त्यातून किती संख्या नियंत्रित झाले याबाबत नागरिकांचे दुमत असले तरी आत्तापर्यंत ६२ हजार श्वानांवर निर्र्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे.
ठळक मुद्देएकूण संख्या संदिग्ध । आता प्रतिश्वान ७०० रुपये खर्च