सटाणा : महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे सचिव राजेश सिंह, सरचिटणीस ब्रिजपाल सिंह व तालुकाध्यक्षा रजनी कुलकर्णी यांनी केले. गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.तालुक्यातील सर्व अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर येथे एकत्र येऊन मोर्चाची सुरुवात केली. मोर्चात महिला व बालविकास कल्याण विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पंचायत समिती कार्यालयात येताच त्यांनी ठिय्या दिला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी घोषणा देण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा राजश्री पानसरे, माधुरी पवार, जिजाबाई अहिरराव, कुसुम खैरनार, चंद्रकलाबाई बेडसे, गायत्री देसले, मनीषा कापडणीस, शालिनी मोरे, मंदाकिनी राजधर, हिराबाई ठाकरे, माया भामरे, सुनंदा बच्छाव, रंजना मगरे, वर्षा भामरे, रूपाली खरे, छाया भामरे, अनिता शेवाळे, केदाबाई अहिरे, ललिता सोनवणे, सुशीला अहिरे, कलावती देवरे आदींसह तालुक्यातील सेविका, मदतनीस कार्यकर्त्या उपस्थित होत्या.विविध मागण्यांचे निवेदन निवेदनात म्हटले आहे की, २५ पेक्षा कमी मुले असतील तर ते अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ट करण्यासंदर्भात काढण्यात आलेला आदेश त्वरित रद्द करावा, अब्दुल कलाम योजनेची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी तसेच अंडी व केळीचे पैसेही तातडीने देण्यात यावे, मानधन न मिळालेल्या कर्मचाºयांना थकीत रक्कम देण्यात यावी, लाइन लिस्टिंगच्या व बालआधार नोंदणीच्या कामाची सक्ती बंद करावी आदींसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
अंगणवाडी कर्मचाºयांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:03 AM
सटाणा : महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे सचिव राजेश सिंह, सरचिटणीस ब्रिजपाल सिंह व तालुकाध्यक्षा रजनी कुलकर्णी यांनी केले. गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
ठळक मुद्देसटाणा पंचायत समितीवर मोर्चा : आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार