नाशिक : पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या पाहणी दौºयात शेतकऱ्यांसह नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडला. यावेळी ठिकठिंकाणी शेतकºयांसह विविध पक्ष-संघटनांनी पालकमंत्र्यांना निवेदने देत उपाययोजनांची मागणी केली.विंचूरला चारा डेपोविंचूर : गिरीश महाजन यांनी विंचूर,भरवस फाटा व परीसरात दुष्काळ पाहणी दौरा केला. विंचूर व भरवस फाटा येथील शेतकºयांनी महाजन यांना निवेदन दिले. शेतकरी कर्ज वसुली थांबवावी, पालखेड डाव्या कालव्यास आवर्तन सोडावे तसेच विंचूर हे गाव परीसरात मध्यवर्ती ठिकाण आहे. परीसरात सुमारे दहा हजारांहून अधिक जनावरे आहेत. या जनावरांना चारा व पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शासनाच्या वतीने येथे चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाजन यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पालखेड डाव्या कालव्यास आवर्तन सोडण्यात येईल तर विंचूर लासलगाव व देवगाव जि.प.गट मिळून विंचूर येथे येत्या दोन ते तीन दिवसांत चारा डेपो सुरू करणार असल्याचे सांगितले. याच बरोबर शेतकºयांचे नादुरु स्त रोहीत्र बदलून द्यावे अशा सुचना अधिकाºयांना दिल्या. याप्रसंगी विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंच सौ.ताराबाई क्षीरसागर, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर पवार, माजी पं.स.सदस्य राजाराम दरेकर, भा.ज.पा. तालुका उपाध्यक्ष निलेश सालकाडे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष निव्रुत्ती जगताप, शहराध्यक्ष नानासाहेब जेऊघाले, भा.ज.पा. विंचूर शहराध्यक्ष सोपान दरेकर,उपाध्यक्ष गोरख सोनवणे युवा नेते डॉ सुजीत गुंजाळ,डॉ रमेश सालगुडे, निलेश दरेकर, ज्ञानेश्वर जाधव,महेश गिरी आदींंसह विंचूर व परीसरातील शेतकरी उपस्थित होते.स्वतंत्र चार डेपोनगरसूल- पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येवला तालुक्यातील नगरसूल परिसरातील दुष्काळी भागाची पाहणी केली. यावेळी पुर्व-उत्तर भागात पाण्या बरोबर, चाºयाचा प्रश्न मोठा गंभीर झाल्याची स्थिती पालकमंत्र्यांना पाहायला मिळाली. येवला तालुक्यात चारा छावणी उभारणेसाठी इतका कालावधी नसल्याने मागणीच्या ठिकाणी स्वतंत्र चारा डेपो स्थापन करण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. यावेळी प्रसाद पाटील, ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.राजापूरला पाहणीराजापूर - येवला तालुक्यातील राजापूर येथे महाजन यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी राजापूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांसाठी चारा डेपो उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कर्जवसुली थांबवाजळगाव नेऊर : येथील ग्रामस्थ, शेतकºयांच्या समस्या महाजन यांनी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्र्यांना कर्जवसुली नोटिसीबाबत माहिती दिली असता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी टँकर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले. तसेच सक्तीची कर्जवसुलीबाबत योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही आश्वासन दिले.नांदूरमधमेश्वर धरणातील गाळ काढणे, लासलगाव महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणे आणि पालखेड कालव्यावरील नदीवर आरक्षित बंधारे भरणे याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील, निवृत्ती जगताप, बाळासाहेब जगताप, राजेंद्र दरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान प्रकाश पाटील यांनी सोळा गावांचे पाणी भरलेल्या दोन बाटल्या पालकमंत्र्यांना दिल्या.निफाड सिन्नर तालुक्यातील बरेचसे पाणी नियोजन नांदूरमधमेश्वर धरणावर अवलंबून आहे़ धरण असूनदेखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़धरणातील गाळ काढल्यास भविष्यात कायमस्वरूपी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही तसेच लासलगाव महसूल मंडळातील दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून दुष्काळग्रस्त नागरिकांना त्यात लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
चारा-पाण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:25 AM
नाशिक : पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या पाहणी दौºयात शेतकऱ्यांसह नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडला. यावेळी ठिकठिंकाणी शेतकºयांसह विविध पक्ष-संघटनांनी पालकमंत्र्यांना निवेदने देत उपाययोजनांची मागणी केली.
ठळक मुद्देमहाजन यांचा दुष्काळी पाहणी दौरा : चारा डेपोसह टॅँकरने पाणीपुरवठ्याची ग्वाही