नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून शिष्यवृत्तीचा प्रश्न, शासकीय वसतिगृह बंद करण्याचा अन्यायकारक प्रस्ताव तसेच वसतिगृहातील प्रवेशप्रक्रिया आणि भोजनाचा प्रश्न आदिंसह विविध मागण्यांसाठी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले. तसेच यासंबंधी आदिवासी विकास आयुक्तांना निवेदन देण्यात आले.आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, शिष्यवृत्तीची समस्या सोडविण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची शासनाने तत्काळ दखल घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी विद्रोही विद्यार्थी संघटनेने दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर संदीप कोकाटे, जालिंदर हिंगे, स्वप्नील धांडे, सचिन बडे, सुरेश गंभीरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विद्यार्थ्यांचे पालकांसह ठिय्या आंदोलन : आदिवासी वसतिगृह
By admin | Published: March 20, 2017 9:25 PM