चांदवड : येथील व्यंकटेश पतसंस्थेचे कर्मचारी शिरीश दत्तात्रय खंदारे यांची हिरोहोंडा मोटारसायकल (क्र. एमएच १५ सीई ५८१५) गुरुवारी (दि. ८) सोमवार पेठेतून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. पोलिसांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी ही दुचाकी वडनेरभैरव येथील गंगोत्री मोटारसायकल वर्क्सचे मालक फिटर संजय जगन्नाथ माळी यांच्याकडे असल्याचे समजले. अज्ञात इसम गाडी लावून गेला तो परत आलाच नाही म्हणून माळी यांनी गाडीची तपासणी केली. त्यात कागदपत्रे मिळाली गाडी शिरीष खंदारे यांच्या मालकीची असल्याचे समजले. वडनेरभैरव येथील विलास खंदारे यांना बोलावून सदरची गाडी दाखविली. त्यांनी खंदारे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले व वडनेरभैरव येथे फिटर माळी यांच्याकडे जाऊन आपली गाडी असल्याची खात्री पटली.मोटारसायकल पंक्चर काढून द्या, मी थोड्या वेळात येतो, असे सांगून अज्ञात इसम मोटारसायकल गॅरेजजवळ लावून गेला. त्याच्याकडे विचारणा केली असता तो गोंधळला होता. कागदपत्राची खात्री केली असता विलास खंदारे यांच्या नातलगाची गाडी असल्याचे समजले. त्यांना सांगून वाहन त्याच्या ताब्यात दिले. - संजय जगन्नाथ माळी, वडनेरभैरव
चोरी गेलेली दुचाकी प्रसंगावधानाने मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:14 AM