पेठ : तालुक्यात दिवसेंदिवस वनांची संख्या घटत असली तरी लाकुडतस्करीचे प्रमाण काही घटलेले दिसत नाही. पेठ हद्दीजवळ बाºहे वनपरिक्षेत्र हद्दीत प्रादेशिक वन विभागाला अशाच प्रकारे तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश मिळविले असले तरी तस्करी करणारे तस्कर मात्र फरार होण्यात यशस्वी झाल्याने अनेक प्रश्न आजतरी अनुत्तरीत आहेत.अज्ञात आरोपींविरुद्ध बाºहे वनपरिक्षेत्रात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ५२ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वनक्षेत्रपाल आर. एच. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. एच कुवर, वनपाल अमीत साळवे, वनरक्षक एस. एस. चव्हाण, नरेश म्हावकर, तुळशीराम खांडवी हे करत आहेत. जप्त मुद्देमालासह वाहन प्रादेशिक वनविभागाच्या म्हसरु ळ डेपोत जमा करण्यात आले आहे. याच मार्गाने लाकडाची तस्करी थेट गुजरात राज्यात होते. तर याच परिसरात वनविकास महामंडळाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.बाºहे वनपरिक्षेत्राचे गस्ती पथक बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भेनशेत वनक्षेत्रातील उंबुरणे-खिर्डी परिसरात गस्त घालत असतांना रात्रीच्या सुमारास उंबुरणे बाजूने एक वाहन येत असल्याचे दिसताच गस्तीपथक दबा धरु न बसले. येणाºया वाहनास अडविले असता वाहन उभे करु न तीन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात मौल्यवान सागवानी लाकडाचे आठ नग आढळुन आले. तस्करी करणारे वाहन हे क्रुझर असून त्याचा क्र . एम. एच. १९- एई १५२२ असा आहे. तर जप्त करण्यात आलेला साग हा ०.७७० घनमीटर इतका असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३५ हजार रु पये इतकी आहे.
पेठ तालुक्यात चोरीचे सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:15 AM
पेठ : तालुक्यात दिवसेंदिवस वनांची संख्या घटत असली तरी लाकुडतस्करीचे प्रमाण काही घटलेले दिसत नाही. पेठ हद्दीजवळ बाºहे वनपरिक्षेत्र हद्दीत प्रादेशिक वन विभागाला अशाच प्रकारे तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश मिळविले असले तरी तस्करी करणारे तस्कर मात्र फरार होण्यात यशस्वी झाल्याने अनेक प्रश्न आजतरी अनुत्तरीत आहेत.
ठळक मुद्दे तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश सागवान वाहनासह जप्त