सटाणा : अवैधरीत्या वाळूने भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगात हॉटेल शबरी शेजारील श्री वेंकटेश इन्व्हेस्टमेंट या दुकानात घुसल्याने भिंत पडून दुकानाचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना गुरुवारी (दि.२० ) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे वाळूचोरी उघड झाली. घटनास्थळावरून ट्रॅक्टरचालक फरार असून सटाणा पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.रात्रगस्तीवर असलेले पोलीस वाहन ट्रॅक्टरच्या मागे येत असल्याचे पाहून ट्रॅक्टर चालकाने विरु ध्द दिशेला ट्रॅक्टर घातले. मात्र रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर थेट प्रवीण माधवराव सोनवणे यांच्या मालकीच्या गाळ्यात घुसला. त्यामुळे दुकानाची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघात घडताच ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन वाळू घटनास्थळी पडली. त्यामुळे सटाणा शहरात वाळूची चोरटी वाहतूक सुरु असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान वाळूचा ट्रॅक्टर ब्राम्हणगाव येथील असल्याचे वृत्त असून, जॉन डीअर कंपनीचा नंबर नसलेला हा ट्रॅक्टर आहे. गाळामालक सोनवणे यांचे या घटनेत मोठे नुकसान झाले आहे.ताडपत्री झाकून वाहतूकट्रॅक्टरमालक व चालकाने आपल्या ट्रॅक्टरमध्ये कांदे असल्याचे भासविण्यासाठी ट्रॉलीवर पिवळ्या रंगाची ताडपत्री टाकलेली होती.मात्र अपघात होऊन ट्रॉली पलटी झाल्याने संबंधितांनी वाळूचोरी केल्याचे उघड झाले आहे.
चोरीच्या वाळूने भरलेला ट्रॅक्टर घुसला दुकानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:58 AM
सटाणा : अवैधरीत्या वाळूने भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगात हॉटेल शबरी शेजारील श्री वेंकटेश इन्व्हेस्टमेंट या दुकानात घुसल्याने भिंत पडून दुकानाचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना गुरुवारी (दि.२० ) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे वाळूचोरी उघड झाली. घटनास्थळावरून ट्रॅक्टरचालक फरार असून सटाणा पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.
ठळक मुद्देअपघातामुळे चोरी उघड : दुकानाचे मोठे नुकसान