नांदगाव : दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली.घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडून आपली कैफियत नागरिकांसमोर मांडतांना मुलांना मारणारा वाहक व केवळ पासधारक असल्याने न थांबता भुर्रकन निघून जाणारी बस यामुळे होणारी नित्याची अवहेलना मुलांनी ठामपणे कथन केली. शाळकरी मुलांच्या या रौद्रावतारापुढे नागरीकही अचंबित झाले.न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पिंप्राळे, जेऊर, हिंगणवाडी, वाखारी येथील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज शाळेत ये जा करत असतात. वरील गावासाठी दोन बसेस सोडण्यात येत असल्याचा दावा आगार व्यवस्थापक यांनी केला. परंतु मुलांनी मोठा आवाज करून हि माहिती चुकीची असल्याचे सांगितले. अनेकदा एकच बस येते. ती ठासून भरल्यानंतर निघून जाते. दरम्यान थांब्यावरची गर्दी बघून दुसºया आगाराच्या किंवा नांदगाव आगाराच्या बसेस थांबत नाहीत. १२ वा. ता भरणाºया शाळेसाठी, सकाळी ११ वा. गावी येणारी बस कित्येकदा १ ते दीड तास उशिराने येते. म्हणून अभ्यास बुडतो. ४.४५ वा.शाळा सुटते. त्यानंतर घरी नेणारी बस सात साडेसात वाजता येते. दीड दोन तास चिमुरडी केविलवाण्या चेहेºयाने बसची वाट बघत थांब्यावर उभी असतात. आलेल्या बसच्या मागे धावतात. रास्ता रोको सुरु झाल्यानंतर पाऊण तासाने व्यवस्थापकांचे आगमन झाले. त्यांनी आपल्याच अडचणी मुलांसमोर मांडायला सुरवात केल्याने उपस्थित मंडळी चिडली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, महेंद्र गायकवाड, अजय पगारे, संजय मोकळ उपस्थित होते.कर्मचारी जुमानत नाहीत वाहक चालक असो की अभियांत्रिकी विभाग असो. ‘मी शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो पण कर्मचारी जुमानत नाहीत’ असे आगार व्यवस्थापक बेलदार यांचे म्हणणे आहे. या सर्वांची झळ नेहमी प्रवास करणाºया प्रवाशांना बसतेच बसते. पोखरी जळगाव खु, वडाळी टाकली बु, बाणगाव, लोहशिंगवे भालूर आदी ठिकाणाहून माध्यमिक व प्राथमिक शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी नांदगावमध्ये येत असतात. त्यासाठी लोकांनी पासेस काढून दिले आहेत. शाळेच्या वेळापत्रकानुसार पोहोचता येत नाही. आणि शाळा सुटल्यावर सायंकाळी घरी लवकर जाता येत नाही अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांची समस्या येथे थांबत नाही.
दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी नांदगावी चिमुरड्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:49 AM
दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली.
ठळक मुद्देरौद्रावतारापुढे नागरीकही अचंबितबस १ ते दीड तास उशिराने येते