लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सीमेवर चिनी सैन्याच्या वाढलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चीनविषयी भारतीय नेटिझन्सकडून संताप व्यक्त होत आहे. तरुण पिढीमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या भावना सोशल माध्यमांमधून व्यक्त होत आहेत. भारतामध्ये कोणतीही वस्तू आणि उत्पादने आली की हुबेहूब तशीच, अत्यल्प दरातील, बनावट उत्पादने भारतात उपलब्ध करून देत चीन भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा नेटिझन्सचा आरोप आहे. सोशल मीडियावर सध्या चीनमधील भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नेटिझन्सनी मोहीमही उघडली आहे. चीनच्या वस्तूंवर आपण पूर्णपणे बहिष्कार टाकला, तर एकाअर्थी चीनचे नाक दाबले जाऊ शकेल, असा मतप्रवाह सोशल मीडियातून उमटतो आहे.
चीनचे आर्थिक आक्रमण थांबवा
By admin | Published: July 10, 2017 12:25 AM