चौकट-
दही, ताक, आइस्क्रीमला मागणी नाही
लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार, हॉटेल्स, विवाह सोहळे व इतर धार्मिक कार्यक्रम बंद झाले. हॉटेल्समधून बटर, पनीर, दही, ताक, लस्सी, आइस्क्रीम यांना मागणी असते. मात्र मार्चपासून मागणी कमी झाल्याचा दावा दूध संकलन केंद्रांकडून केला जात आहे.
कोट-
लॉकडाऊनमुळे दुधाचा उठाव कमी झाला आहे. दूध संस्थांची स्थानिक विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे दुधाचे दर घसरले आहेत. आता लॉकडाऊन उठले आहे जर सर्व सुरळीत राहिले तर किमान २०-२५ दिवसांत दुधाच्या दरात थोडीफार सुधारणा होण्याची शक्यता आहे.
-सूर्यभान शिरसाट, सचिव, सिद्धेश्वर दूध संस्था
कोट-
हिरवा चारा, ढेप यांचे दर गोणीमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. कोरडा चारा चार हजार रुपये शेकड्यापर्यंत जातो. असा खर्च वाढत असताना दुधाला १८-१९ रुपये लिटरचा भाव देता हे कितपत योग्य आहे.
- शंकरराव ढिकले, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना, जि. नाशिक (फोटो ०९ शंकर ढिकले)