ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील कृषी वीजजोडण्या सरसकट न तोडता थकीत वीजबिल टप्प्या-टप्प्याने भरण्यास २०२४ पर्यंत मुभा दिली आहे. त्याच धर्तीवर वीजबिल भरण्याची तयारी असलेल्या मात्र कोरोना महामारीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांना थकीत वीजबिल भरण्यास मुभा मिळावी, अशी मागणी होत आहे. कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवितानाही दमछाक होत असताना थकीत वीजबिलापोटी सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांची वीजजोडणी तोडण्याच्या महावितरणच्या धडक कारवाईमुळे नागरिकांना मानसिक धक्का बसला आहे. ही वीजमीटर तोडणी व सक्तीची वीजबिल वसुलीची कारवाई तातडीने थांबवावी अन्यथा याविरोधात जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसे सातपूर अध्यक्ष अंकुश पवार, विजय अहिरे, सचिन सिन्हा, मिलिंद कांबळे, अंबादास अहिरे, किशोर वडजे,योगेश लभडे,ज्ञानेशवर बगडे, आरती खिराडकर,अक्षय भदाणे, तेजस वाघ आदी उपस्थित होते.
(फोटो २७ मनसे) महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसेचे अंकुश पवार. समवेत विजय अहिरे,सचिन सिन्हा,मिलिंद कांबळे,अंबादास अहिरे, किशोर वडजे,योगेश लभडे,आरती खिराडकर आदी.