पिंपळगाव बसवंत : शेतकरी व सर्वसामान्य जनतेकडून सुरू असलेली सक्तीची वीजवसुली त्वरित थांबवावी व १०० कोटींची खडणी वसुली करण्यास सांगणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निफाड फाटा परिसरात आंदोलन करण्यात येऊन महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, तसेच पिंपळगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांना निवेदन देण्यात आले.मागील काही दिवसांपासून घरगुती व शेतकरी वीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे धाडसत्र सुरू केले आहे. महावितरण कार्यालयाने सक्तीची वसुली तातडीने थांबवावी; शिवाय गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी शहर भाजपतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, भाजप युवा मोर्चाचे प्रशांत घोडके, शहराध्यक्ष गोविंद कुशारे, दत्तात्रय काळे, अशोक मोरे, रमेश कदम, संदीप झुटे, जय रावल, राहुल सोनवणे, चेतन मोरे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सक्तीची वीज वसुली थांबवा; पिंपळगावी भाजपचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 11:17 PM
पिंपळगाव बसवंत : शेतकरी व सर्वसामान्य जनतेकडून सुरू असलेली सक्तीची वीजवसुली त्वरित थांबवावी व १०० कोटींची खडणी वसुली करण्यास सांगणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निफाड फाटा परिसरात आंदोलन करण्यात येऊन महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, तसेच पिंपळगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देवीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन खंडित