दिंडोरी : दारूबंदी जनआंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी दिंडोरी दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांना तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन देत साकडे घातले.तालुक्यातील जानोरी येथे मध्यवस्तीत सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून, त्यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने हे दुकान स्थलांतरित करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.दारू दुकान परिसरात मद्यपींकडून शिवीगाळ करणे, महिलांना बघून मुद्दाम लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, महिलांची छेडछाड करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरातील महिलांनी वेळोवेळी प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही दुकान स्थलांतरित होत नाही. याउलट पोलीस महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.यावेळी सुमन घोरपडे, जयश्री घोरपडे, सुनंदा विधाते, संगीता लहारे, योगीता काळोगे, सुशीला शिंगाडे, आशा रोगटे, रोहिणी वाघ, शकुंतला जाधव, अलका साबळे, बेबी नाडेकर, भारती बदादे, इंदूबाई टोंगारे, चंद्रकला सोनवणे आदींसह महिला उपस्थित होत्या.आश्वासनाचा प्रशासनाला विसरगावातील दारू दुकानामुळे एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्यानंतर दिंडोरी येथील प्रशासकीय अधिकाºयांनी दारू दुकान स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दिलेल्या आश्वासनाचा प्रशासनाला विसर पडला असून, दारू दुकान त्वरित स्थलांतरित करावे व जानोरी गावातील बेकायदेशीर दारूविक्र ी, मटका, सोरट आदींसह अवैद्य धंद्यांचा बंदोबस्त करावा, अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले.
अवैध धंदे बंद करण्यासाठी पालकमंत्र्यांना महिलांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 1:20 AM
दिंडोरी : दारूबंदी जनआंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी दिंडोरी दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांना तालुक्यात सुरू ...
ठळक मुद्देपोलीस महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप