नामपूर : कांद्याला किमान अनुदान मिळावे, शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, वीज बिल व बँकांची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, संपूर्ण कर्जमाफ करून सात बारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी येथील मालेगाव ताहाराबाद रस्त्यावर बाजार समिती गेट समोर सोमवारी सकाळी ११ वाजता सर्व सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बागलाण तालुक्यातील सुमारे ५२ खेड्याचे वीज मंडळाचे मुख्य कार्यालय नामपूरला आहे .मात्र गेल्या दोन मिहन्यांपासून या कार्यलयाचे कामकाज शेतकरी विरोधी असून .गलथान व भोंगळ कारभारामुळे परिसरातील जनता त्रस्त झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक सावंत ,खेमराज कोर , काँग्रेसचे गुलाबराव कापडणीस , शेतकरी संघटनेचे दीपक पगार , शिवसेनेचे समीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकºयांनी सुमारे दोन तास रास्ता रोको केला. यावेळी ज्येष्ठ नेते खेमराज कोर , अशोक ठाकरे ,विनोद पाटील ,वीज मंडळाचे अधिकारी एन एम सूर्यवंशी ,पोलीस निरीक्षक गणेश गुरव ,मंडळ अधिकारी सी पी अहिरे, कार्यकारी अभियंता ए डी उकइ यांनी आंदोलकांशी सवांद साधला. रास्ता रोको प्रसंगी नामदेवराव सावंत ,शशिकांत कोर ,गुलाबराव कापडणीस,रामू अिहरे ,अशोक ठाकरे ,विनोद पाटील उपस्थित होते . येत्या दोन दिवसात जनतेच्या समस्या सुटल्या नाहीत तर वीज मंडळाच्या जिल्हा कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे .
नामपूरला सर्वपक्षिय रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 4:12 PM