शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Published: May 30, 2017 12:17 AM

त्र्यंबकेश्वर : कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी तुपादेवी फाट्यावर रास्ता रोको करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी तुपादेवी फाट्यावर रास्ता रोको करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांची यामुळे कोंडी झाली होती.यावेळी भरउन्हात शेकडो शेतकरी रस्त्यावर बसले होते. दोन्हीही बाजूने रस्ता अडवून धरल्याने वाहनांची कोंडी झाली होती. १ जूनपासून सर्व शेतकरी संपावर जात आहेत. शासनाला इशारा देण्यासाठी आजचा हा रास्ता रोको करण्यात आला. तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येत तुपादेवी येथे दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. तसेच १ जूनपासून संपावर जाण्यासाठी शपथ घेतली.यावेळी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह तालुक्यातील सर्वच नेत्यांनी किसान क्रांतीचा आजचा रास्ता रोको केला, तसेच येत्या १ जूनपासूनचा संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मागण्यांचे निवेदन त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शिवसेना शहर संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे, गणेश चव्हाण, ग्राहक सेना अध्यक्ष शिवाजी कसबे, संतोष मिंदे, शांताराम पोरजे, श्रीराम कोठुळे, भाऊसाहेब कोठुळे, राजाराम चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते.