लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : पिंपरी येथील शेतकऱ्यांनी पिंपरी फाट्यावर एकत्र येत सरकारविरोधात घोषणा देत सुमारे तीन तास येवला-लासलगाव महामार्ग रोखून धरला. यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी एसटी बसमधील प्रवाशांना आंदोलनकर्त्यांकडून पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या रास्ता रोकोत सरपंच अरु ण पानसरे, श्याम गुंड, शरद कुदळ, बालाजी गुंड, प्रवीण गुंड, कान्हुराज गुंड, संपत गुंड, शिवाजी भोसले, दत्ता पानसरे, वाल्मीक कुदळ, भिका कुदळ, माऊली गुंड, मारु ती गुंड, गणेश रसाळ, विलास कुदळ, गवाजी शिंदे, दौलत पानसरे, गणेश पानसरे, सुभाष गुंड, योगेश पानसरे, चांगदेव जाधव, भिका गुंड, कैलास भालेराव, छबू गुंड आदींसह किसान क्रांतीचे कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते. येवला तालुक्यातील पिंपरी फाट्यावर शासनाच्या विरोधात घोषणा देत रास्ता रोको करण्यात आला.
पिंपरी फाट्यावर रास्ता रोको
By admin | Published: June 06, 2017 2:06 AM