नाशिक : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीच्या विरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये भाजपा सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. मात्र आज गरिबांसाठी जगणे नकोसे झाले आहे, इतकी महागाई वाढली आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किमती नियंत्रणात राहिलेल्या नाही. शेती मालाच्या किमतीत दिवसागणिक वाढ होत आहे. रोजच्या जीवनातील भाज्या व डाळींचे भाव गगणाला भिडले असून, जनतेला महागाईमुळे पालेभाज्या व जीवनावश्यक वस्तू विकत घेणे मुश्किल झाले आहे. यावेळी रास्ता रोकोमध्ये महिला कॉँग्रेस अध्यक्ष नगरसेवक वत्सला खैरे, शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, समिना मेनन, योगीता अहेर, ज्युली डिसूझा, चारुशीला काळे, शोभा गोदणेकर, लक्ष्मीताई लोखंडे, संगीता बागुल, मैरुनिसा शेख, चारुशीला शिरोडे, कल्पना पांडे, कुसूम चव्हाण, मनीषा लासुरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहर कॉँग्रेसचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 11:13 PM