देवळा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे देवळा येथे सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाचकंदील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, बाजार समितीत अडते, व्यापारी व दलाल यांच्याकडून होणारी लूट थांबवावी, एफडीआय धोरण मागे घ्यावे आदि विविध मागण्यांसाठी देवळा येथे बाजार समितीपासून पाचकंदील चौकापर्यंत माकपाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माकपचे कार्यकर्ते व महिला बहूसंख्येने सहभागी झाले होते. पाचकंदील येथील रास्ता रोको आंदोलनामुळे शहादा-प्रकाशा राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत पाचकंदील चौकापासून १०० मीटर अंतरावर वाहतूक रोखल्याने चौकात वाहनांची गर्दी झाली नाही. देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळीपोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सुरगाणा - विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माकपाने पुकारलेल्या देशव्यापी संपात तालुका माकपच्या वतीने येथील होळी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार जे. पी. गावित यांनी मार्गदर्शन करून सरकारवर टीका केली. यावेळी माकप व किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
माकपच्या वतीने रास्ता रोको
By admin | Published: September 02, 2016 9:45 PM