सिन्नर : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परतीचा पावासामुळे पिंकांचे नुकसान झाल्याने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच पीकपाहणी न करता शेतकऱ्यांना सरसकट प्रती एकर एक लाख रु पये नुकसान भरपाई देऊन सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्यातील पांगरी येथे छावा संघटनेच्यावतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात तालुक्यात पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच काही गावांमध्ये शिवार रस्ते पावसामुळे वाहून गेले असून त्यांना मालवाहतूक व ये-जा करण्यासाठी रस्ते राहिले नसून त्यांना लवकरात लवकर रस्ते तयार करून देण्यात यावे. तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आता शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे परंतु वीज टिकून राहावी याकरिता सब-स्टेशनला अतिरिक्त दहा ट्रान्स्फार्मर देण्यात यावे. ज्यामुळे शेतकºयांना पिकांना पाणी देताना वारंवार वीज जाऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तसेच महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा आदीसह विविध मागण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली पांगरी येथे सिन्नर- शिर्डी रस्त्यवर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ झाला.
नुकसान भरपाईच्या मागणीसाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 3:49 PM