मराठा आरक्षणाबाबत बुधवारी (दि.५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन आरक्षण रद्द करण्यात आल्याचे कळताच मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गावर जाऊन रेल्वेच्या ओवर ब्रिजवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, सहाय्यक निरीक्षक तायडे, पोलीस हवालदार सुनील पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन भागवत झाल्टे, भीमराज लोखंडे, नाना शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व येथे काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
फोटो - ०५ मनमाड मराठा
मनमाड येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते.
===Photopath===
050521\05nsk_40_05052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ मनमाड मराठा मनमाड येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते