दिल्ली येथील किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ माकपा, किसान सभा, डीवायएफआय, एसएफआय, जनवादी महिला संघटना यांच्या वतीने सापुतारा - नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील नागझरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकपा, किसान सभा, शेतकरी आदींनी भारत बंदला पाठिंबा दिला. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी प्रतिसाद देऊन शंभर टक्के बंद ठेवून प्रतिसाद दिला. बसवाहतूक, खासगी वाहने धावत नसल्याने रस्त्यावर, तर सुरगाणा शहरात कडकडीत बंदमुळे शुकशुकाट दिसून आला. तसेच आठवडे बाजारदेखील बंद होते. भारत बंदला पाठिंबा असल्याचे निवेदन नायब तहसीलदार सुरेश बकरे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, किसान सभेचे सुभाष चौधरी, युवा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुभाष भोये, युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू पवार उपस्थित होते.
फोटो- ०८ सुरगाणा बंद
भारत बंदला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथे कडकडीत बंद पाळण्यात आल्याने मुख्य बाजारपेठेत दिसत असलेला शुकशुकाट.
फोटो- ०८ नागझरी फाटा बंद
नागझरी फाटा येथे किसान सभेच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको.
===Photopath===
081220\08nsk_27_08122020_13.jpg~081220\08nsk_29_08122020_13.jpg
===Caption===
भारत बंदला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथे कडकडीत बंद पाळण्यात आल्याने मुख्य बाजारपेठेत दिसत असलेला शुकशुकाट.~नागझरी फाटा येथे किसान सभेच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको.