नांदगांव : अनैसिर्गक पाणी टंचाई निर्माण होवून नांदगांव शहर व ग्रामीण भागाला अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे पाणी टंचाई व प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रास्ता रोको आंदोलनावेळी तहसिलदार नांदगांव, मुख्याधिकारी नगर परिषद नांदगांव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शहरात पाणी पुरवठा करतांना नगर परिषद प्रशासनाकडून दुजाभाव केला जात आहे. ठराविक भागाला वेळेत व भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो तर काही भागांना अनियमित पाणी पुरवठा केला जातो. या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नांदगांव शहर व ५६ खेडी पाणी पुरवठा योजनेवरील गावांना व नांदगांव शहराला १५ ते २० दिवसांनतर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नांदगांव नगर परिषद प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन व वेळा पत्रक तयार करावे, शहरातील विंधन विहिरींवरील हातपंप दुरु स्त करण्यात यावे, ज्या हातपंपाना जास्त प्रमाणात पाणी आहे त्या विंधनविहिरीवर जलपरी मोटार बसविण्यात याव्यात, माणिकपुंज धरणावरून शहरासाठी पाणी आरक्षण करण्यात आले आहे परंतु पाणी पुरवठा करणारी यंत्रणा निकृष्ठ असल्यामुळे संपूर्ण पाणी उपलब्ध होत नाही, शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा दुषित पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नांदगांव तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, शहर अध्यक्ष अरु ण पाटील, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सीमा राजुळे, युवक कार्याध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त करून प्रशानाच्या व शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला.यावेळी संतोष गुप्ता, अरु ण पाटील, इक्बाल शेख, वाल्मिक टिळेकर, अशोक गायकवाड, योगिता गुप्ता, सीमा राजुळे, भारती गायकवाड, सतीष अहिरे, सुरज पाटील, तुळसाबाई महाजन, शोभा आहेर, कमल सोनवणे, सुमन घोडेराव, मंगला विसपुते, रमा साळुंके आदीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच या आंदोलनाला स्वाभिमानी युथ पिब्लकन पार्टी नांदगांव तालुका तर्फे कार्याध्यक्ष कपिल तेलुरे, माया उशिरे, स्वाती पवार व भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, शहर अध्यक्ष उमेश उगले, स्वप्निल शिंदे, कृष्णा त्रिभुवन यांनीही जाहीर पाठिंबा दिला.
नांदगावी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:09 PM