चांदवड - अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची द्यावी या मागणीसाठी तालुका शिवसेनेच्यावतीने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून चांदवड-मनमाड रोड येथील गणूर चौफुलीवर मका रस्त्यावर टाकुन सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला. काही काळ दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. मार्चाने जाऊन तहसीलदारांना मागण्याचे निवेदन दिले . पोलीसांनी बंदोबस्त चोख ठेवला. केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध म्हणून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली तालुका प्रमुख शांताराम ठाकरे यांचे नेतृत्वाखाली सोमवारी चांदवड तहसील कार्यालयावर चांदवड तालुका व शहर शिवसेना , युवासेनेच्या व महिला आघाडीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी गणुर चौफुली येथे अतिवृष्टीमुळे खराब झालेला मका रस्त्यावर टाकुन मनमाडरोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे मोर्चाने जाऊन प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले. तहसीलदारांना निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाढवून मिळावी व त्वरीत मिळावी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, नव्हे तर सातबारा कोरा करण्यात यावा ,शेतकºयांना अडचणीच्या काळात कर्जरुपाने मदत करावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
नुकसान भरपाईच्या मागणीसाठी चांदवडला शिवसेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 4:08 PM