सुरगाणा : विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बस दर शनिवारी बंद राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने प्रत्येक शनिवारी बस सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी येथील होळी चौकात स्टुण्डट फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यात विविध भागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र दर शनिवारी या बस बंद ठेवल्या जात आहे. या मागणीसाठी येथील होळी चौकात रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून नायब तहसीलदार एम.के. खैरनार यांना निवेदन दिले तर येथे उपस्थित असलेले सुरगाणा बसस्थानकातील व्यवस्थापक चौधरी यांनी तालुक्यात सात बस सुरू असून, शनिवारी सुरू करण्याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी एसएफआयचे ज्ञानेश्वर भुसारे, मनोज देशमुख, गिरीधर भुसारे, नर्मदा चौधरी, ललिता भोये, रोहिणी गावित, पूजा महाले, अजय टोपले, देवेंद्र महाले आदींसह उपसभापती इंद्रजित गावित, धर्मेंद्र पगारिया पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे आदी उपस्थित होते.
बससाठी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:56 AM