औंदाणे- बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्यात सध्या टोमॅटोला घरातुन पैसे टाकुनही केवळ तीन ते चार रूपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामीण भागात औदाणे, तरसाळी, भाक्षी, मुळाणे, मुंजवाड, परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी ,दसाणे, केरसाने, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदि गावातील शेतकºयांनी टोमॅटो चांगला बाजारभाव मिळेल,या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकचा खर्चसुद्धा निघत नाही. शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण टोमॅटोला औषध फवारणी, बांधणी, मिल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रु पये खर्च करूनही आज टोमॅटो तीन-चार रु पये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकºयांचा खर्चही निघत नाही.त्यामुळे टोमॅटो तोडून बाजारात विक्र ीसाठी नेली असता त्याचा खर्चसुद्धा निघत नाही व उलट शेतकºयांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्ष टोमॅटो पिकामध्ये शेतकºयांना फटका बसत आहे. पूर्वी नगदी पिक म्हणून टोमॅटो ओळखला जात होता. परंतु हल्ली कोणत्याही कारणाने टोमॅटो दर मिळत नाही. या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. तसेच काळजीही घ्यावी लागते. दर न मिळाल्याने मोठे कर्ज शेतकºयांच्या अंगाशी येते. टोमॅटो हा नाशवंत पिक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही. तरी देखील परिसरातील बहुतेक शेतकºयांनी आपल्या टोमॅटो शेतात तोडणी बंद केली आहे.त्यामुळे शेतात टोमॅटो खच पडला असून शेत लाल दिसू लागले आहेत. शेतकºयांना पहिल्या हप्त्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र गेल्या दोन दिवसात कांद्याचेही बाजारभाव उतरल्याने कांद्याबरोबर टोमॅटो नेही शेतकर्यांना रडवले.कोणत्याही पिकला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आणखीच अडचणीत सापडला आहे.आत्ता शेती करायची तरी कशी आणि पिक घ्यावे तरी काय असा गंभीर प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे.
टोमॅटोला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांकडून तोडणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:27 PM