नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून राजकीय व्यक्तींच्या दारोदार भटकणाºया समर्थकांना आता खुद्द छगन भुजबळ यांनीच सबुरीचा सल्ला दिला असून, आपला न्यायप्रक्रियेवर विश्वास असल्याने त्यातून न्याय मिळेल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावनिक न होता ‘अन्याय पे चर्चा’ थांबवावी, असा निरोप पाठविला आहे.मुंबईत आज न्यायालयीन सुनावणीसाठी छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी त्यांची आमदार पंकज भुजबळ यांनी भेट घेतली असता त्यांच्याकरवी कार्यकर्त्यांना उपरोक्त निरोप पाठविण्यात आला आहे. भुजबळ यांना विशेष न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर गेल्या महिन्यापासून राज्यातील भुजबळ समर्थकांनी एकत्र येत त्यांच्यावर होत असल्याची अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलने सुरू केली होती. त्यासाठी गावोगावी धरणे, आंदोलने करण्यात आलीव त्यानंतर काही समर्थकांनी राजकीय व सामाजिक व्यक्तींच्या घरोघरी जाऊन ‘अन्याय पे चर्चा’ सुरू करून भुजबळांच्या पाठीशी समर्थन वाढविण्यास सुरुवात केली होती. त्यातून राज ठाकरे, एकनाथ खडसे, शेकाप नेते आमदार जयंतभाई पाटील या नेत्यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटी घेण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि, समर्थकांच्या या कृत्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधलेल्या छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सहानुभुतीपोटी कार्यकर्त्यांनी राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी थांबवाव्यात. आपला न्यायालयीन प्रक्रियेवर आणि माननीय न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे. न्यायालयाकडून आम्हाला निश्चित न्याय मिळेल. मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांनी भावनिक न होता संयम बाळगावा आणि आपले सामाजिक कार्य अखंड सुरू ठेवावे, अशा सूचना त्यांनी आमदार पंकज भुजबळ यांना केले. छगन भुजबळ यांनी दिलेल्या सूचनांचे कार्यकर्त्यांनी पालन करावे, असे आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी केले आहे.छगन भुजबळ यांच्या आवाहनामुळे आता समर्थकांना ‘अन्याय पे चर्चा’ थांबवावी लागणार असून, गेल्या महिनाभर समर्थकांकरवी हा प्रकार केला जात असताना असे अचानक काय झाले की भुजबळ यांनाच यात हस्तक्षेप करावा लागला व चर्चा थांबवा, असे सांगावे लागले याविषयी आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.का घ्यावा लागला निर्णय?छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करणे म्हणजे एकप्रकारे न्यायालयीन प्रक्रियेवरच अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करणे, असा समज त्यातून निर्माण होत होता. शिवाय भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºया काहींनी आपणच भुजबळ यांच्या किती जवळचे आहोत हे दाखविण्यासाठी अन्य समर्थकांना डावलण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अन्य समर्थकांमध्ये गटबाजी निर्माण होऊन नाराजी व्यक्त केली जात होती. राजकीय व्यक्तींच्या भेटीतून ही बाब नजरेत भरत होती.विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या दरबारी गेलेल्यांना ठाकरी भाषेत फटकारे बसले, शिवाय ठाकरे यांनी भुजबळांविषयी सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या सत्तेच्या काळातील गोष्टींचीच अधिक चर्चा झाली. भुजबळ यांचे राष्टÑीय व राज्यस्तरीय नेतृत्व पाहता, त्यांच्या सुटकेसाठी दुय्यम राजकीय दर्जाच्या व्यक्तींची भेट घेणे एकप्रकारे भुजबळ यांचे स्थान व प्रतिष्ठा कमी करण्यासारखे आहे.शिवाय काही राजकीय व्यक्ती अन्याय पे चर्चा करण्यासाठी वेळ देत नसल्याने तो एकप्रकारे भुजबळ यांचाच अपमान असल्याचे मानले जात असल्यामुळेदेखील भुजबळ यांना हा निर्णय घ्यावा लागला असावा. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर भुजबळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी या महिन्याच्या अखेरीस होत आहे. समर्थकांच्या या आक्रस्ताळेपणाने न्यायालय नाराज होऊ शकते त्यामुळे अखेर ‘चर्चा’ थांबविण्याचा निर्णय घेतला गेला असावा, असे बोलले जात आहे.
‘अन्याय पे चर्चा’ थांबवा; भुजबळांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:32 AM
नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून राजकीय व्यक्तींच्या दारोदार भटकणाºया समर्थकांना आता खुद्द छगन भुजबळ यांनीच सबुरीचा सल्ला दिला असून, आपला न्यायप्रक्रियेवर विश्वास असल्याने त्यातून न्याय मिळेल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावनिक न होता ‘अन्याय पे चर्चा’ थांबवावी, असा निरोप पाठविला आहे.
ठळक मुद्देगावोगावी धरणे, आंदोलने