शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

पांगरीत छावा संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:04 PM

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून टॅँकर सुरु करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्यावतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून टॅँकर सुरु करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्यावतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे पाऊण तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर््फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टॅँकरचे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय दुतर्फा घेतला जाईल व दूध दरवाढीबाबत वरिष्ठांकडे भावना पोहचविल्या जातील असे आश्वासन तहसीलदार नितीन गवळी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेही या आंदोलनास पाठींबा दिला होता. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर छावा संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी व महिला रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. हंडे घेऊन महिला रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दूध दरवाढ झालीच पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरु करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी वसंत पगार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सरकार शेतकऱ्याविरुध्द असून आतापर्यंत शेतकºयांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप केला. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला असल्याचे ते म्हणाले. दूध खरेदी व दूध पिशवी विक्रीमध्ये असणारी तफावत दूर करत स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर सुभाष पगार, शत्रुघ्न झोंबड, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनानंतर तहसीलदार नितीन गवळी पांगरी येथे दाखल झाले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. पंचाायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे आनंद रासणे, मंडळ अधिकारी व्ही. व्ही. गोसावी, ग्रामविकास अधिकारी पी. आर. बोरसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक