शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

शेतकऱ्यांचा कळवणला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 6:18 PM

ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या नावाखाली लोकप्रतिनिधीनी निवडणुकांच्या तोंडावर राजकारण न करता प्रकल्पाचे काम मार्गी लावावे या मागणीसाठी ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, दहयाणे परिसरातील शेतकरी बांधवांनी बस स्थानकासमोर मेनरोडवर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देगेल्या ४१ वर्षापासून ओतूरच्या पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे

कळवण : ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या नावाखाली लोकप्रतिनिधीनी निवडणुकांच्या तोंडावर राजकारण न करता प्रकल्पाचे काम मार्गी लावावे या मागणीसाठी ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, दहयाणे परिसरातील शेतकरी बांधवांनी बस स्थानकासमोर मेनरोडवर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.ओतूरचे देवा भुजाडे, अशोक मोरे, दिगंबर पवार, शब्बाण पठाण, अतुल देवरे, बाळासाहेब देशमुख, ललित मोरे, भाऊसाहेब मोरे, भगवान मोरे, स्वप्निल देवरे, बाबा शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डॉ. तृप्ते यांना निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना ओतूर प्रकल्प संदर्भातील मागणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन पाठवून भावना कळवू असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.ओतूर धरण हाच आमचा पक्ष असल्याचा जयघोष करत लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सकाळी दहा वाजता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. सरकारच्या व मंत्र्याच्या घोषणावर आमच्या शेतकºयांना आता भरवशा नसून वेळप्रसंगी लोकसभेच्या मतदानावर ओतूर परिसरातील शेतकरी बहिष्कार टाकतील असा इशारा देऊन या विषयाकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.गेल्या ४१ वर्षापासून ओतूरच्या लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या गळतीच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत असून कोणत्या अन कोणत्या कारणामुळे ओतूर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यातील अंसतोषाला वाट मोकळी करून दिली.रास्ता रोको आंदोलनात राजेंद्र भामरे, संदीप वाघ, प्रदीप पगार, भाऊसाहेब मोरे, पर्वत मोरे, दिपक अहेर, उत्तम पवार, नागेश मोरे, सुभाष देवरे, रफीक पठाण, राजू देशपांडे, पंकज मेणे, मोसीन पठाण, समाधान देवरे, अतुल देवरे, गोकुळ देवरे, शाबान पठाण, मंगेश देसाई, भाऊसाहेब मोरे, अशोक मोरे, युवराज मोरे, बाळासाहेब देशमुख, धना देवरे, भास्कर देशमुख, मोसीन पठाण, शांताराम मोरे, विजय गायकवाड, संजय काळे, संदीप देवरे, मुकेश आहेर, योगेश पगार, भूषण देवरे, वैभव देवरे, अशोक मोरे, तन्मय दशपुते, मुकुंद देवरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.ओतूर परिसरात पाणी टंचाईओतूर खोºयातील गावांचा वाड्यांचा आणि वस्तीचा पाणीप्रश्न सोडविणारा ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या प्रकल्पातून पाणी गळती होते, त्यामुळे हिवाळ्यातच कोरडाठाक पडतो. ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्प तिन्ही बाजुंनी डोंगरमाथ्यांच्या पायथ्याशी आहे. पावसाळ्यात जोराच्या पहिल्या पावसातच हा लघुपाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरतो. तर संपूर्ण उर्वरित पावसाळ्यात यातील पाणी पुढे जाते. परंतु हे सर्व पाणी भराव व सांडव्याच्या खालून पडलेल्या घळीतून वाहून जाते. आणि हिवाळ्याच्या अखेरपर्यंत यातील सर्व पाणी संपून जाते. अनेक शेतकºयांनी लघुपाटबंधारे प्रकल्पात विद्युतपंप टाकूण पाणी पळवत असल्याने पाणी लवकर संपण्यास मदत होते. हिवाळ्यातच प्रकल्प कोरडेठाक पडतो यावर अवलंबून असलेले या भागातील विहिरी, विंधन विहिरी असे जलस्त्रोतांचे पाणी कमी पडण्यास सुरूवात होते. याचा फटका पाण्याची टंचाई असलेल्या ओतूरसह नरूळ, कन्हेरवाडी, कुंडाणे, दह्याणे, मेहदर या गावांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन