शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

नामपूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:53 AM

नामपूर : येथील बाजार समितीत मागील वर्षापासून शेतकºयांचे थकलेले पैसे तत्काळ मिळावेत तसेच दुधाला हमीभाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या गेटसमोर संतप्त शेतकºयांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देथकीत पैशांमुळे आंदोलन कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नामपूर : येथील बाजार समितीत मागील वर्षापासून शेतकºयांचे थकलेले पैसे तत्काळ मिळावेत तसेच दुधाला हमीभाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या गेटसमोर संतप्त शेतकºयांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सटाणा बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूरला स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आली. यात शासन नियुक्त प्रशासक मंडळ निर्माण झाले. या काळात सटाणा येथील रहिवासी शगुणा अकील शेख, अखलाख रफीक शेख, अकील रफीक शेख या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना बाजार समितीने कांदा खरेदीचा परवाना दिला होता. या व्यापाºयांनी २१५ शेतकºयांचे ४८ लाख रु पये गत वर्षापासून थकवले आहेत. याबाबत शेतकºयांनी अनेकदा बाजार समितीकडे चकरा मारल्या मात्र बाजार समितीकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने हा रास्ता रोको केला. नामपूर बाजार समितीच्या मागील प्रशासकीय मंडळाने शेतकºयांचे पैसे बुडवणाºया व्यापाºयाला हाताशी धरल्यामुळेच आज बाजार समितीला व शेतकºयांना बुरे दिन आले असून, दोषी संचालकांवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रि या स्वाभिमानी संघटनेचे संघटक प्रवीण अहिरे यांनी व्यक्त केली. शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांना दुधाचा टॅँकर अडवताना अटक झाल्यामुळे यावेळी भाजपा शासनाचा निषेधही करण्यात आला.याप्रसंगी बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब भामरे, उपसभापती लक्ष्मण पवार, भाऊसाहेब अहिरे, आनंदा मोरे यांच्यासह संचालकांनी मालेगावचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन व्यापारी शेख यांना तत्काळ अटक करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब भामरे यांनी या घटनेत राजकारण न करता शेतकºयांचे थकीत पैसे मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली. या रास्ता रोको आंदोलनामुळे मालेगाव ताहाराबाद रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलीस अधिकारी सतीश गावित, श्रीराम कोळी, नायब तहसीलदार एन.के. चव्हाण, मंडळ अधिकारी सी. पी. अहिरे, पोलीसपाटील बाजीराव सावंत, सचिव संतोष गायकवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या आंदोलनानंतर शेतकºयांचे पैसे मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन