उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळच्या सत्रात कांदा लिलाव झाला नाही. कारण केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करावे, हमीभाव मिळवून द्यावा व अनुदानाची मुदत मार्च महिन्यापर्यंत वाढवून द्यावी आदि मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबपर्यत रांगा लागल्या होत्या. तहसीलदारांचे प्रतिनिधी तलाठी व्ही. ड़ी. कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनप्रसंगी बाजार समितीचे सभापती विलास देवरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले. यावेळी बाजार समितीचे सचिव नितीन जाधव, संचालक संजय देवरे, राजेंद्र खैरनार, प्रवीण बाफणा आदि उपस्थित होते. आंदोलन दरम्यान उमराणे बिटचे पोलीस हवालदार एस. ड़ी. पवार, एन. बी. सावकार, गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर )
कांदा उत्पादकांचा रास्ता रोको
By admin | Published: December 23, 2016 12:12 AM