येवला : मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लाल सेनेच्या कार्यकर्त्यांनी येवला-विंचूर चौफुलीवर शुक्र वारी दुपारी १२ च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक थांबली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असणारे निवेदन शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, तालुका पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांनी स्वीकारले . रु द्रवाडी येथे नवरदेवाने मंदीरात प्रवेश केला म्हणून मारहाण केली. मालेगाव तालुक्यात गिलाने येथे मातंग कुटुंबीयांना मारहाण झाली. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहीरीत अंघोळ केली. म्हणून मातंग समाजाच्या मुलांना मारहाण करून नग्न धिंड काढण्यात आली. या तीनही घटनेचा लालसेनेने निषेध व्यक्त करीत रस्ता रोको केला. दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लालसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश नेटारे, संदीप कांबळे, मोतीराम नेटारे, मनोहर कांबळे, अनिल आव्हाड, मच्छंीद्र जोगदंड, विलास आव्हाड, सुरेश आव्हाड, लक्ष्मण लोखंडे, गीताराम आव्हाड, भास्कर आव्हाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
येवल्यात लाल सेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:26 AM