नाशिक : मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नाशिक जिल्हा मुस्लीम विकास आरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी (दि.२७) रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. मुस्लीम समाजाला रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती, डॉ. महेमुद्दल आयोगाच्या अहवालावर आधारित आरक्षण, शिक्षण व संरक्षण मिळावे या मागणीसाठी व मुस्लीम समाजाची अवस्था सर्वच क्षेत्रात मागासलेली असतानाही शासन स्तरावर मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप करीत मुस्लीम विकास आरक्षण संघर्ष समितीने द्वारका चौकात रास्ता रोको केला. त्यामुळे मुस्लीम समाजाला १० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शेख हनिफ बशीर, जावेद पठाण, विशाल वारुळे, नदीम शेख, दाऊद शेख, शेरू मोमीन, जावेद इब्राहिम आदी उपस्थित होते.
मुस्लीम समाजाला आरक्षणासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 1:09 AM