साकोरा : ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षातत्र ३ ते ६ हजार रु पये पर्यंत मानधन मिळते. ते सुध्दा ६महिन्यापासुन रखडले आहे. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे आॅनलाईन कामकाज ठप्प होणार आहे.विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले, उतारेसाठी ग्रामस्थांची अडचण निर्माण होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा ‘‘ड’’ घरकुल यादीचा सर्वे देखील जिल्ह्यातील संगणक परीचालक करीत होते. काम बंद आंदोलनामुळे आवास योजनेच्या कामावर देखील परीणाम झालेला दिसून येत आहे. एकीकडे शासन डिजिटल इंडिया , डिजिटल महाराष्ट्र करत आहे. परंतु डिजिटल इंडिया करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परीचालक हा महत्वाचा घटक आहे. संगणक परीचालकांनी अनेक आंदोलने केली आहे. परंतु शासनाने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत सी.एस. सी. एस.पी.व्ही. कंपनीला पाठीशी घालुन संगणक परीचालकांवर अन्याय करत आहे.तरी सर्व थकीत मानधन संगणक परीचालकांना मीळावे, पंचायत समतिी मधील संगणक परीचालकांना आपले सरकार प्रकल्पामध्ये सामावुन घ्यावे अशा प्रकारचे निवेदन नाशिक जिल्हा सरचिटणीस सोमनाथ उडकुडे , नांदगाव तालुका अध्यक्ष दिपक त्रिभुवन , उपाध्यक्ष विजय आहेर सचिव राकेश ताडगे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.यावेळी तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.कंपनीच्या अनागोंदीमुळे मानधन ठप्पजिल्हयातील संगणक परीचालक यांचे एप्रिल,मे,जून २०१७ चे मानधनाचे पैसे कंपनीला जाऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेले तरी कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे अजून मानधन प्राप्त झाले नाही. ग्रामपंचायत मधून मागील मिहन्याचे चेक जिल्हा परीषदेला जमा करून पण अद्याप जून मिहन्यापर्यंतचे मानधन झालेले नाही. जिल्ह्यात ग्रामपंचायत मार्फत जुलै २०१८ पासून पुढील महिन्याचे चेक पूर्ण ग्रामपंचायत चे अद्याप जमा झालेले नाही त्यामुळे पुढील मानधन कसे होणार व कधी होणार याची शाश्वती नाही. काही संगणक परीचालकांचे इनव्हाईस डिममध्ये गेल्याने सदर महिन्यातील मानधन झालेले नाही.
आपले सरकार सेवा केंद्र परीचालकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:25 PM
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षातत्र ३ ते ६ हजार रु पये पर्यंत मानधन मिळते. ते सुध्दा ६महिन्यापासुन रखडले आहे. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे आॅनलाईन कामकाज ठप्प होणार आहे.विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले, उतारेसाठी ग्रामस्थांची अडचण निर्माण होणार आहे.
ठळक मुद्देमानधन रखडले : शासनप्रणित सी.एस. सी. एस.पी.व्ही. कंपनीवर रोष