नाशिक : देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसचा शुभारंभ शुक्रवारी (दि.७) देवळाली कॅम्प स्थानकातून झाला. या कार्यक्रमासाठी थेट स्थानकावर दाखल झालेल्या खासदार हेमंत गोडसे यांना फलाटावर प्रत्यक्ष सजवलेल्या रेल्वेकडे जाण्यापासून रेल्वे प्रशासनाने रोखल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांना अधिकाऱ्यांनी लॅपटॉप उपलब्ध करून देत स्टेशन मास्तरांच्या कॅबीनमध्ये बसविले मात्र पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्यांची व्हिडिओ लिंक ओपन झालीच नाही. यामुळे खासदार गोडसे यांना आॅनलाइनही कार्यक्रमातही सहभागी होता आले नाही. यामुळे आपल्या मतदारसंघातून किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू होत असल्याचा आनंद असतानाच रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम झाल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांची गोडसे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.मध्य रेल्वेने देवळाली कॅम्प ते दानापूर (बिहार)दरम्यान किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू केली असून, त्याचा शुभारंभ आॅनलाइन पद्धतीने झाला. सर्व मान्यवर या कार्यक्रमात आॅनलाइन सहभागी झाले होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मात्र काही शिवसैनिकांसह प्रत्यक्ष देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ते स्थानकात उपस्थित असताना रेल्वे अधिकाºयांनी त्यांना ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता (इंजिनजवळ) तेथे बोलावले नाही. त्यांच्यासाठी एक लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आला. पण अखेरपर्यंत लॅपटॉपवर लिंक ओपन झालीच नसल्याने त्यांना कार्यक्रमात आॅनलाइन आणि आॅफलाइनही सहभागी होता आले नाही. याबाबत खासदार गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली.स्थानिक शेतकरी अशोक पाळदे, कैलास गोडसे, रामदास ढाकणे आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी रेल्वेस्थानकावर भुसावळ विभागाचे एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, डीएसटीई विजय खैंची, देवळाली स्टेशन प्रबंधक एम. के. सिन्हा आदींसह अधिकारी उपस्थित होते.अधिकाºयांच्या गलथान कारभाराचा फटकादेशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसचा नाशिक येथून शुभारंभ होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी मी पाठपुरावा केला होता. त्याला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मागणी पूर्ण झाली असून, मतदारसंघातील शेतकºयांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. याचा आनंद आहे. मात्र स्थानिक रेल्वे अधिकाºयांच्या गलथान कारभारामुळे कार्यक्रमात सहभागी होता आले नाही याबाबत नाराजी असल्याचे गोडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार हेमंत गोडसे यांना रोखल्याने रंगले राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 1:19 AM
देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसचा शुभारंभ शुक्रवारी (दि.७) देवळाली कॅम्प स्थानकातून झाला. या कार्यक्रमासाठी थेट स्थानकावर दाखल झालेल्या खासदार हेमंत गोडसे यांना फलाटावर प्रत्यक्ष सजवलेल्या रेल्वेकडे जाण्यापासून रेल्वे प्रशासनाने रोखल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांना अधिकाऱ्यांनी लॅपटॉप उपलब्ध करून देत स्टेशन मास्तरांच्या कॅबीनमध्ये बसविले मात्र पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्यांची व्हिडिओ लिंक ओपन झालीच नाही. यामुळे खासदार गोडसे यांना आॅनलाइनही कार्यक्रमातही सहभागी होता आले नाही.
ठळक मुद्देकिसान एक्स्प्रेस : उपस्थित राहूनही फलाटावर जाण्यास मनाई