सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडण्यासह मोठे नुकसान झाले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील काही गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला. एप्रिलच्या मध्यावर असह्य उकाड्याने त्रस्त असणाऱ्या पूर्व भागातील काही गावात किरकोळ पाऊस झाला; मात्र वादळाने मोठे नुकसान केले.पांगरी, वावी, निºहाळे, पाथरे, मºहळ, शहा या भागात मोठ्या प्रमाणात वादळ होते.सिन्नरच्या तापमानाने ४० डिग्रीचा आकडा पार केला असल्याने असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी दुपारपासून आकाशात ढगांची गर्दी होऊ लागल्यावर तापमानात काहीशी घट जाणवली. सायंकाळी ५ वाजेनंतर मात्र जोरदार वारे वाहू लागले. नांदूरशिंगोटे, कणकोरी, खंबाळे, देवपूर, भोकणी, पांगरी, वावी, मीरगावसह पूर्व भागात वादळी वाºयासह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे बेसावध असणाºया शेतकऱ्यांची धांदल उडाली.पाऊस कमी, मात्र वाºयाचा वेग अधिक असल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. काही भागात पावसाचा जोर अधिक असल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र होते. देवपूर फाटा परिसरात काही प्रमाणात गारादेखील पडल्याचे सांगण्यात आले. पोल्ट्रीफार्मचे शेड उडाले; ५०० कोंबड्या मृतपाथरे : शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या वादळी वाºयाने सिन्नर तालुक्यातील मीरगाव शिवारातील प्रकाश नामदेव शेळके यांच्या मालकीच्या असलेल्या बॉयलर कोंबड्यांच्या तीन पोल्ट्री फार्मचे सीमेंट पत्रे उडाले. यात सीमेंट पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. या शेडमध्येच शेळके कुटुंब राहते; परंतु हे कुटुंब या नैसर्गिक आपत्तीतून बचावले. प्रकाश शेळके हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोल्ट्रीफार्मकडे जात असताना पत्र्याचा तुकडा त्यांच्या हातावर येऊन आदळला. त्यात त्यांना जखम झाली. वाºयामुळे एका पोल्ट्रीफार्मचे अतोनात नुकसान झाले. यातील सुमारे पाचशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. बाकीच्या कोंबड्या दुसºया पोल्ट्रीफार्ममध्ये रात्री रवाना केल्या. तीनही फार्ममध्ये जवळपास बारा हजार कोंबड्या होत्या. शेळके यांचे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.
सिन्नरच्या पूर्व भागात वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:25 AM
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडण्यासह मोठे नुकसान झाले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील काही गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला. एप्रिलच्या मध्यावर असह्य उकाड्याने त्रस्त असणाऱ्या पूर्व भागातील काही गावात किरकोळ पाऊस झाला; मात्र वादळाने मोठे नुकसान केले.
ठळक मुद्देपांगरी, वावी, निºहाळे, पाथरे, मºहळ, शहा या भागात मोठ्या प्रमाणात वादळ