शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

येवला तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:01 PM

येवला/जळगाव नेऊर : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील जन्याबाई पोपट पाडेकर यांच्या घराचे पत्रे उडून धान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पुस्तकांचे नुकसान झाले तसेच अर्जुन आनंदा जाधव यांच्या घराचे पत्रे, कांदा चाळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघरावरील पत्रे उडाले : पिंपळगाव लेप सजेत पंधरा लाखांचे नुकसान

येवला/जळगाव नेऊर : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील जन्याबाई पोपट पाडेकर यांच्या घराचे पत्रे उडून धान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पुस्तकांचे नुकसान झाले तसेच अर्जुन आनंदा जाधव यांच्या घराचे पत्रे, कांदा चाळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जऊळके शिवारातील दिनकर सूर्यभान शिंदे यांचे पत्र्याचे शेड उडून नुकसान झाले असून, वेणूबाई चव्हाण व रंगनाथ शिंदे यांच्या घरावरील पत्रे या वाºयाने उडून गेले आहेत. तसेच चांगदेव रामा जाधव यांच्या शेतातील दत्तमंदिरावर पन्नास वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड पडल्याने मंदिर जमीनदोस्त झाले. पिंपळगाव लेप सजेत पंधरा लाखांच्या आसपास नुकसान झाले असून, तलाठी कमलेश पाटील यांनी घरोघरी जाऊन पंचनामा केला आहे. प्रचंड उन्हाच्या काहिलीत गेल्या तीन महिन्यांपासून भाजून निघाल्यामुळे प्रत्येक जण पावसाची वाट पाहत होता; पण पावसाबरोबर वादळी वाºयाने शेतकºयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वादळामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस चांगला असला तरी शेतकºयांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे.येवलाजोरदार वादळासह अल्पपावसाचा अनुभव मंगळवारी सलग चौथ्या दिवशी येवलेकरांनी घेतला. या वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसानझाले. तसेच खिर्डीसाठे येथे वीजपडून शेळी व मेंढी जागीच ठारझाली.गेल्या तीन दिवसांप्रमाणे मंगळवारीही सुरु वातीला दहा ते पंधरा मिनिटे जोरदार वादळ झाल्याने ग्रामीण भागात विशेषत: पूर्वभागात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या वादळी पावसामध्ये कोळम खुर्द येथील संतोष साहेबराव भांडे यांचे पत्रे उडाले. देवदरी, खरवंडी व रहाडी येथे वादळी वाºयामध्ये पत्रे तसेच घराचे खूप नुकसान झाले आहे. ममदापूर येथे जनार्दन गुडगे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले, तर जिजाबाई लहू साबळे यांच्या घराची भिंत पडून त्या जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता येवला येथे दाखल करण्यात आले आहे. श्रवण साबळे व भाऊसाहेब वैद्य यांचे घर पडले. येथील व खरवंडी येथे शाळेचे पत्रे उडून गेले तसेच दहेगाव, पाटोदा येथील सुधाकर आहेर यांच्या घराचेही पत्रे उडाले. खिर्डीसाठे येथे अर्जुन साबळे यांची मेंढी तसेच तुळशीराम पवार यांची शेळी वीज पडून ठार झाल्या.पिंपळगाव लेपमध्ये जन्याबाई पाडेकर यांच्या घराचे पत्र्याचे छत वादळामुळे उडाले. त्यात घरगुती सामानाचे नुकसान झाले. तसेच जन्याबाई व त्यांचा मुलगा विजय जखमी झाला असून, डोक्याला व पायाला टाके पडले. जऊळके येथे जाधव वस्तीवर पिंपळाचे झाड कोसळून नुकसान झाले. ममदापूरला अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून, केरे वस्ती हनुमान मंदिर वरील पत्रे उडून गेले आहेत.येवल्याच्या २० टक्के भागात अंधारशनिवारी झालेल्या वादळी पावसाने शहरात विजेचे खांब पडून तारा तुटल्या आहेत. अनेक ठिकाणी खांबावर झाडे पडल्याने खांब वाकले आहेत. तसेच तारा तुटल्याने शहराच्या बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरणच्या कर्मचारी व अधिकाºयांनी दोन दिवस मेहनत घेऊन अनेक भागात पुरवठा सुरळीत केला असला तरी विंचूर रोड परिसरात काही भागात सलग तिसºया दिवशी अंधार आहे. अजूनही १५ ते २० टक्के भागात वीजपुरवठा खंडित होता. जऊळके येथे विजेचे खांब तसेच तारा तुटलेल्या असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत.वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू आहेत. भिंत पडून मृत झालेल्या महिलेच्या नातेवाइकांना व वीज पडून बैलजोडी ठार झालेल्या महिलेला शासकीय मदत देण्यात आली आहे. प्रशासन नुकसानीचा आढावा घेण्यासह पंचनामा करण्यासाठी दक्ष आहे.- रोहिदास वारु ळे, तहसीलदार, येवला