नाशिक : नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयांवर संसदीय पद्धतीने एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण व आक्रमक पद्धतीने त्यांची मते मांडल्याने या महाविद्यालयीन उपक्रमात संसदीय चर्चेचीच अनुभूती उपस्थितांना मिळाली. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण संस्था (विधान भवन, मुंबई), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विकास मंडळ आणि एचपीटी आटर््स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालय यांच्यातर्फे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या टी. ए. कुलकर्णी हॉलमध्ये संयुक्तरीत्या आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा सचिव राजेंद्र भागवत, विधी व न्याय विभाग सहसचिव भूपेंद्र गुरव, विधान परिषद सभापतींचे विशेष कार्य. अधिकारी नंदलाल काळे, महाराष्ट्र विधानसभेचे उपसचिव विलास आठवले, वि. स. पागे संस्थेचे संचालक नीलेश मदाने, विधानसभेचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र संख्ये, उपप्राचार्य डॉ. वृंदा भार्गवे आदी उपस्थित होते. ‘संसदीय अभ्यास वर्ग’ कार्यशाळेचे शनिवारी अभिरूप संसद कार्यक्रमाने उद्घाटन झाले. राज्यशास्त्र विभागाच्या २१ विद्यार्थ्यांनी संसदेत विधेयक मांडण्याची प्रक्रिया सादर केली. अभिरूप संसदेत वादग्रस्त ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक’ अध्यक्षांनी सरकार पक्षाच्या बाजूने टाकलेल्या निर्णायक मताने मंजूर झाले. तत्पूर्वी या विधेयकावरील चर्चेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आपापल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले.अभिरूप लोकसभेत अध्यक्षाची भूमिका विकास प्रसाद याने भूषविली. तर पंतप्रधान म्हणून सिध्दी भंडारीने विधेयकाचे जोरदार समर्थन केले. सुमित गौली याने विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत विधेयकातील तरतुदींवर जोरदार आक्षेप नोंदवत या कायद्याला विरोध केला. श्याम देशपांडे याने मंत्री म्हणून सरकारची बाजू मांडली. मिताली तिवाटणे हिने विरोधी मत मांडले. लोकसभेतील पध्दतीप्रमाणे महासचिव, अतिरिक्त सचिव आणि लघुलेखनिक म्हणून अथर्व घोरपडे, सोनाली गोसावी आणि श्लोक सानप यांनी चोख भूमिका बजावली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, डॉ. प्रशांत देशपांडे यांनी आभार मानले.
एचपीटीतील अभिरूप संसदेत सीएए, एनआरसी, एनपीआर विषयांवर वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 10:41 PM
एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयांवर संसदीय पद्धतीने चर्चा केली.
ठळक मुद्देएचपीटीतील अभिरूप संसदेत सीएए, एनआरसी वर चर्चाराज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा चर्चेत सहभाग