पावसामुळे कांद्यात भरले पाणी.
लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : सगळा खेळ पंधरा मिनिटांचा.... तीन-चार महिन्यांच्या मेहनतीवर वादळी पाऊस पाणी फिरवून गेला. या पावसामुळे जळगाव खुर्द, पिंपरखेड या गावातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले.तालुक्यातील ९०० हेक्टर शेतातील पिकांचे सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली.खरिपात अतिवृष्टी झाली होती तरी जमिनीत पाणी आहे या आशेवर रब्बी पिकांच्या उत्पन्नाने झालेला तोटा भरून निघेल हा आशेचा किरणही अवकाळी पावसाने धुऊन टाकला. आता काय करू, कुठे जाऊ...आम्हाला काय मदत मिळेल हो? असा टाहो तालुक्यातील शेतकरी फोडत आहेत.डॉक्टरवाडी, बाभूळवाडी, चांदोरे, चिंचविहीर, पोखरी, ढेकू या गावातील रब्बी पिके उद्ध्वस्त झाली. जळगाव खुर्दच्या गोरख सरोदे यांचा मका, पिंपरखेडच्या सूर्यवंशी यांचे कांदे, संत्री व द्राक्षे, दिवटेचा कांदा असो की परिसरातील इतर शेतकरी असोत सर्वांनाच मोठा फटका बसला आहे.दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी त्यांच्या कार्यालयाची टीम व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी यांना सकाळीच नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शासकीय पंचनाम्याचा पाठपुरावा करण्यासाठी धाडले आहे. नगरसेवक किरण देवरे, संतोष गुप्ता, सागर हिरे, राजाभाऊ जगताप, प्रमोद भाबड, सुधीर देशमुख आदी कार्यकर्ते गावांमध्ये जाऊन भांबावलेल्या शेतकरी वर्गास दिलासा देण्याचे काम सुरू केले आहे. तसेच तहसीलदार योगेश जमदाडे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार कांदे यांच्या कार्यालयात विशेष कक्ष उभारण्यात आला असून, कागदपत्रे व पंचनामे यासाठी मदत करण्यात येणार आहे. पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.आमदार कांदे यांनी आपल्या फोनवरून सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकरी वर्गास आर्थिक दिलासा देण्याची मागणी करणार आहे. दरम्यान ग्रामस्तरीय समिती संबंधित गावांकडे रवाना झाल्या आहेत.कृषी अधिकारी पाटील यांनी सांगितले की, गारांच्या माºयाने खाली पडलेली द्राक्षे तर खराब झालीच आहेत, परंतु झाडावरची सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसांत सडून जातील, अशी परिस्थिती आहे.सोपान डोखे, कृषी सहायक श्रीमती चव्हाण, तलाठी रीमा भागवत, हरेश्वर सुर्वे, शिवराम कांदळकर, प्रताप गरु ड, योगेश गरु ड, जीवन गरुड, अनिल सरोदे, राजू चाकणकर आदींसह संबंधित गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. चांदोरा, पिंपरखेड, जळगाव खुर्द या गावातील शेतात मोठे नुकसान झाले आहे. पिकांची जाऊन पाहणी केली असता शेतकरी खºया अर्थाने गारपीटग्रस्त झाले असल्याचे कळते. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतकरी बांधवांनी या संकटामुळे हताश होऊ नये, आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगत अश्विनी आहेर यांनी यावेळी शेतकरी बांधवांना धीर दिला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.- अश्विनी आहेर, सभापती,महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद शनिवारी रात्री साडेसात वाजता १५ मिनिटे गारांचा वर्षाव व पावसाने १२ एकरावरील पीक नष्ट झाले. त्यांचा मका, कांदा, गहू, हरभरा ही पिके जमीनदोस्त झाली. पिकांची पाने चिरली गेली. गहू झोपला, गारांनी झोडपलेला हरभरा आडवा झाला. घरात पत्नी, दोन मुले व मुलगी आहे. गेल्या काही वर्षांत पाणी नव्हते. यंदा जमिनीत पाणी आले तर गारांच्या माºयाने संपूर्ण नुकसान झाले. आमचे कष्ट पाण्यात गेले.- भोपालाल राठोड, शेतकरी, ढेकू