शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कुस्त्यांच्या दंगलीने देवगाव यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 6:25 PM

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली.

ठळक मुद्देजगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

देवगाव : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली. महाराष्ट्रातील औरंगाबाद, तुळजापूर, शिरु र, अहमदनगर, चाळीसगाव, नाशिक, येवला, मनमाड, उस्मानाबाद येथील मल्लांच्या सहभागाने चित्तथरारक फड रंगला, बांगडी, स्वारी, धोबीपछाड, कालीजंग, टांग असे एकसे बढकर एक डावपेच मल्लांनी दाखवत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. मोठे पहिलवान मैदानात उतरताच कुस्त्या अधिक रंगल्या होत्या. चार दिवस चाललेल्या महोत्सवात मातेच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यांवरून ढोल ताशांच्या गजरात जगदंबा मातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यात्रेनिमित्त जिल्ह्यातील भाविकांसह नोकरी, शिक्षण, व्यवसाय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्थानिक झालेले देवगावकर मोठ्या भक्तिभावात जगदंबा मातेच्या दर्शनासाठी यात्रेसाठी आले होते. भाविकांनी केलेले नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विजयी झालेल्या मल्ल्यांना येवला पंचायत समितीचे उपसभापती रु पचंद भागवत, विजय अढांगळे, नयना निकाळे, बापू मल्हारी, अरविंद बडवर, पं.स. सदस्य गयाबाई सुपनर, अनिल लोहारकर, उपसरपंच विनोद जोशी, संजय अढांगळे, संदीप डुकरे, किरण अढांगळे, नारायण आव्हाड आदी मान्यवरांनी बक्षिसासाठी रक्कम दिली.पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, राजाराम मेमाणे, निवृत्ती बोचरे, दत्तात्रय बोचरे, जयेश लोहारकर, उत्तम मेमाणे, गोपीनाथ मेमाणे, अश्पाक शेख, तुकाराम बोचरे, विनायक बोचरे, नामदेव बोचरे, विश्वनाथ निलख, संपत अढांगळे, रवींद्र बोचरे, संतोष बोचरे, राजेंद्र मेमाणे, मनोहर बोचरे, योगेश बोचरे, रवींद्र साबळे, भागवत बोचरे, लहानू मेमाणे, उमर काद्री, जावेद शेख, वैभव जोशी, दगू बोचरे, परसराम बोचरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. लासलगाव पोलीस सहायक निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसपाटील सुनील बोचरे, देवगाव बीट हवालदार डी.के. ठोंबरे, एम.एम. उबरे, कोळपे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

टॅग्स :NashikनाशिकWrestlingकुस्ती