नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या वतीने आयोजित ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या समारोपप्रसंगी वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा व काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सावानाच्या स्व. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात या समारोप सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर मेळाव्याच्या अध्यक्षा लेखिका व अनुवादक अपर्णा वेलणकर, उद्घाटक नवनाथ गोरे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.यात चंद्रकांत महामिने विनोदी कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक - डॉ. विनोद गोरवाडकर, द्वितीय क्रमांक - राजेंद्र उगले तर तृतीय क्रमांक सुशीला संकलेचा यांना मिळाला. कवी गोविंद काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक - प्रा. जावेद शेख, द्वितीय क्रमांक काशीनाथ गवळी तर तृतीय क्रमांक संजय गोराडे व राजश्री भिरूड यांना विभागून मिळाला. तसेच डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक रावसाहेब जाधव, द्वितीय क्रमांक डॉ. रोशनकुमार पाटील, तृतीय क्रमांक किरण सोनार यांना मिळाला. जयश्री राम पाठक उत्कृष्ट काव्यसंग्रह स्पर्धेचे विजेते सुदाम राठोड ठरले. तर जयश्री राम पाठक उत्कृष्ट कविता सादरीकरण कवयित्री पुरस्कार विजेत्या सुशीला संकलेचा या ठरल्या.
कथा, काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:19 AM