त्र्यंबकेश्वर : मागील १० ते १५ दिवसांपासून येथे सुरु असलेल्या अन्नपूर्णा मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची शनिवारी सांगता झाली. सोहळ्याच्या सांगता समारंभप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सिध्दपीठ श्री अन्नपुर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगीरीजी महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मीक कार्यक्रम संपन्न झाले.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महाराजांचा आश्रम झाल्यानंतर आपल्या गुरु ंच्या इच्छेनुसार महामंडलेश्वर स्वामी प्रभानंदगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून श्री अन्नपुर्णा मातेचे मंदीर त्र्यंबकेश्वरला साकार झाले. गेल्या ८ वर्षांपासून मंदीराचे काम सुरु होते. गेल्या पाच महीन्यांपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पाशर््वभूमीवर माँ अन्नपुर्णा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची जोरदार तयारी सुरु होती. त्यासाठी शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
त्र्यंबकला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:57 PM